मुंबई | बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना व भाजपमधील वाद अधिकच चिघळला आहे.
राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत शिवसेनेला धारेवर धरलं होतं. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.
आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या शिवसेनेचा लाऊडस्पीकर हा 56 वर्षे झाला सुरू आहे, असं वक्तव्य राऊतांनी केलं.
महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा आहे. त्यामुळे मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
जरी भाजपचे लोक म्हणत असतील शिवसेनेसोबत आहेत तरी ते शिवसेनेसोबत नाहीत. तुम्ही आधी सरकार स्थापन करा आणि मग बोला, असंही राऊत म्हणाले.
शिवसैनिकांच्या अश्रूंच्या महापूरात हे सरकार वाहून जाईल. आम्ही काही त्यांच्यासारख्या तारखा देत बसणार नाहीत, असा टोलाही राऊतांनी लगावला.
दरम्यान, एक महिन्यानंतरही हम दोनो एक दुजे के लिए चालू आहे, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“शिवसेना फुटल्याचं फुकटचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते श्रेय उद्धव ठाकरेंचच”
उरल्या सुरल्यांचं काय ऐकायचं म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…
“उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”
“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”
मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू