Sanjay Raut: संजय राऊतांनंतर नंबर कुणाचा?, निलेश राणे म्हणाले ‘उद्धव ठाकरेंचा’

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊतांवर झालेली कारवाई सुडबुद्धीने केल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

ईडीने आज संजय राऊत यांच्या अलिबागमधील प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशातच आता महाविकास आघाडीतील नेते संजय राऊतांच्या बचावासाठी सरसावले आहेत, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत काय धुतल्या तांदळासारखे आहेत काय?, असा सवाल आता भाजप खासदार निलेश राणे यांनी केली आहे. चोरी करण्याची सवय लागली की ते काळा पैसा कमवतात.

कोणतीही ट्रेल मिळाल्याशिवाय ईडी कारवाई करेल का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित करत त्यांनी कारवाईचं समर्थन देखील केलं आहे.

आम्ही एवढी किंमत संजय राऊतांना देत नाहीत. नगरसेवकाची निवडणूक जिंकू शकत नाही. त्यांची किंमत शुन्य अससल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत.

आहे कोण संजय राऊत? कुणाचं तरी सकाळी येऊन मनोरंजन करतात, असा खोचक टोला देखील निलेश राणे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर आता पुढचा नंबर कोणाचा?, यावर पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा असल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीकडून हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याची विकेट पडणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sanjay Raut: “आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन”

IPL मध्ये अंडरटेकरची एन्ट्री! अय्यरने थेट गळाच पकडला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर

  “शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”