संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…

मुंबई | बंडखोर आमदारांनी उपस्थित केलेल्या नाराजीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो, असं संजय राऊत म्हणालेत.

मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे.महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे, त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत, मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि मी ते काय आहेत, हे मला माहिती आहे, असं राऊत म्हणालेत.

आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झालाय,आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत बोलणारच, असंही राऊत म्हणालेत.

राज्यपालांनी जे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ते कायद्याला धरून नाही. अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत आमची कायदेशीर बाजू सांभाळत आहेत. उद्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ दे, मग बघू, असं संजय राऊत यांनी म्हटले.

16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमती, शेतजमीन लपवल्याचा आरोप

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा” 

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला 

‘तुमचे पुत्र, प्रवक्त्यांनी बाप काढायचा आणि तुम्ही समेटाची हाक द्यायची’, शिंदेंचा घणाघात