मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
लोकांना फसवणं ही भाजपची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ते मुंबई पत्रकारांशी बोलत होते.
भाजपला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांकडून केला जातो. हा दावा खोडून काढत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
ईडीने काल संजय राऊत यांची काल तब्बल 10 चौकशी केली. या चौकशीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘काल मला भाजपच्या एका शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं.
माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं राऊत म्हणालेत.
शिवसैनिक कोणत्याही दबावाला आणि मोहाला बळी पडणार नाही. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र पराभूत झालो असतो तरी मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, असं राऊतांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवारांना दुसरा झटका
बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल
टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले…
उपमुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल!
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी