संजय राऊतांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊतही शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत!

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारलं आहे. या बंडात सुरुवातीला 20 ते 25 आमदार होते. त्यानंतर हळूहळू इतर आमदार शिंदे यांच्या गोटात जावून मिळालं.

आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वारंवार टीका करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील होऊ इच्छित आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

संजय राऊत हे बंडखोर 40 आमदारांवर सडकून टीका करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करत आहेत. असं असताना त्यांचा सख्खा भाऊ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना घरातच फुटली की काय?, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहेत. उदय सामंत नॉट रिचेबल आहेत.

उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार” 

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 

आणखी एक मंत्री नॉट रिचेबल; शिवसेनेचं टेंशन वाढलं

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर