मुंबई | महाविकास आघाडी सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सक्तवसूली संचनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. परिणामी राज्यात नवा वाद उद्भवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये जोरदार वाद वाढला होता. आता या वादात संजय राऊतांच्या कारवाईची भर पडली आहे.
महाविकास आघाडी सत्ता स्थापनेत संजय राऊतांनी मोठी कामगिरी बजावली होती. तसेच ईडीच्या कारवाईविरोधात संजय राऊत उघड भूमिका देखील घेत होते.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून असत्यमेव जयते, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. मी कष्टातून कमावलेली संपत्ती असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
आम्ही काही प्राॅपर्टीवाली माणसं नाहीत. 2009 मध्ये कष्टातून ही जागा घेतली आहे. एक रूपयाचा जरी गैरव्यवहार आढळला तरी सर्व संपत्ती भाजपला दान करेन, असंही राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारमध्ये मोठ्या वादाला सुरूवात झाल्याचं बोलण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर संजय राऊत यांनीच आपल्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज