मुंबई | महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत मराठी पाट्यांचं श्रेय हे मनसेचं असल्याचं म्हटलंय. आता यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
कुणी काय सल्ला दिलाय यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरू आहे. आता असं आहे की अनेक जण आमच्या पक्षातून बाहेर गेले पण विचार तोच घेऊन गेले आहेत ना?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
कोण काय बोलतंय किंवा काय बोलतील यावरून महाविकास आघाडीचं धोरण किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी मनसेला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.
काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं दु:खद निधन
धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील ‘पम्मी तुम जिती मै हारा’ तेव्हाच…- करूणा मुंडे
“चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत पण त्यांनी…”
चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक
पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम