मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत. सोमय्यांनी देशद्रोह केला आहे, त्यांनी 100 कोटींच्यावर घोटाळा केला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्यांवर केला आहे.

आयएनएस विक्रांत भंगारात चालली होती. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 58 कोटी रूपये गोळा केले. सेव्ह विक्रांत चळवळ केली त्यातून पैसे गोळा केले होते. त्यावेळी 200 कोटी रूपये राज भवनात जमा करू असं सोमय्या यांनी सांगितलं होतं. पण 2013 – 2015 मध्ये विक्रांत नौकेसाठी पैसे जमा केले आहेत का असं माहिती अधिकारात विचारलं गेलं होतं. त्यावर राज्यपालांचे उत्तर आहे की, असे कोणतीही पैसे जमा केले नाहीत, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. केंद्रीय यंत्रणांचा सोमय्यांना पाठिंबा आहे का? सीबीआय ईडीला हा गुन्हा मोठा वाटत नाही का, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते कसं कारवाई करणार, आयएनएस विक्रांतचे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत वापरले आणि निवडणूकीसाठी वापरले, असा आरोप राऊत यांनी केलाय.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो.  यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला 

आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई 

कोरोनाचं नवं गंभीर लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका! 

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दीपाली सय्यद संतापल्या, म्हणाल्या… 

भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेचा संताप; दिला ‘हा’ गंभीर इशारा