मुंबई | राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बीकेसीतील सभेनंतर जोरदार रंगत आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सभा घेत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांच्या भाषणातील हिंदी भाषेवरून राज्यात जोरदार वाद होत आहे. हिंदी भाषिकांच्या संमेलनाला संबोधित करताना मुंबई महापालिकेवर फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते.
फडणवीस यांच्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले फडणवीस सध्या वैफल्यग्रस्त असल्याची टीका राऊतांनी केली आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणं कठीण असते. अपघात अटळ आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. परिणामी वाद देखील वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात वाद वाढत चालला आहे. शिवसेनेनं भाजपला मुंबई तोडायची आहे, असा आरोप केला होता.
उद्धव ठाकरेंच्या सभेतील प्रत्येक आरोपावर फडणवीसांनी धारदार शब्दात वार केले आहेत. आम्हाला मुंबई भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी हनुमान चालीसेतील दोन ओळी या चुकीच्या पद्धतीनं म्हणल्याचा वाद आता सर्वत्र होत आहे. परिणामी फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी देखील होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज