मुंबई | शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा 2019 च्या निकालानंतर मैत्री संपून सुरू झालेली राजकीय लढाई आता टोकाला गेल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेची सुत्र हातात घेतलेल्या शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान मिळत आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर वाद वाढला आहे.
शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर हिंदूत्त्वावरून टीका करायला सुरूवात केली आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप देशद्रोहींच्या बाजूनं उभारलेला पाहून गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवर, डाॅ. हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी, डाॅ. मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.
ईडीच्या कारवाईवर देखील राऊतांनी भाष्य केलं आहे. तुम्ही आमच्या पाठीवर वार करा, शिवसैनिकांचं मनोबल खचलं नाही, उलट आम्ही अधिक जोरात आहोत, असंही राऊत म्हणाले आहेत.
भाजपच्या भ्रष्टाचाऱ्यांना जातील त्या ठिकाणी जोडे मारल्याशिवाय जनता राहाणार नाही. तुमची नाटकं आणि नौटंक्या खूप झाल्या, असं राऊत म्हणाले आहेत.
देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. कुणी गद्दार या मातीत निपजत असेल तर त्याला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, राऊतांवर कारवाई झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी सैनिकांचे पैसे लाटल्याचा आरोप आता सोमय्यांवर होत आहे. परिणामी राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत”
“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”
खळबळजनक! ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप
महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!