Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”

sanjay raut 1 e1636820547854
Photo Courtesy- Facebook/Sanjay Raut

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख या नात्यानं आज बीकेसीत आयोजित शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला संबोधित करणार आहेत.

उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण करणारा विषय असतो. असंच काही सभेपूर्वी राज्यात घडत आहे.

राज्यातील देशातील वातावरणात आलेलं मळभ, गढुळपणा हे उद्धव ठाकरेंच्या सभेनं दुर होईल, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेनं महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल आणि आकाशात फक्त भगवा रंगच दिसेल. अर्थात हे राज्य आधीपासूनच शिवरायांच्या विचारांवर चालत आलं आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

काही लोक राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.

विरोधकांच्या पोटदुखीवर, जळजळीवर आज सभेत योग्य उपचार केले जातील, असं म्हणत राऊतांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या इशाऱ्यांनी राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा 

खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!