ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवर चर्चा झाली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना राज्यसभेत बोलण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता संजय राऊत मुंबईत दाखल झाले.

मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर संजय राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशा पथकांच्या गजरात संजय राऊतांचं स्वागत शिवसैनिकांनी केलं. विमानतळावर हजारो शिवसैनिक एकवटले होते.

पुढची 25 वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. तुम्हाला देखील आम्ही उद्धवस्त करु, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

आम्ही कुठल्याही संकटाला एकजुटीनं सामोरं जावू. महाविकास आघाडी एकत्र हे मोदी आणि पवार भेटीतून सिद्ध झालंय, असंही राऊत म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांचा भ्रष्टाचार आता समोर आला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे विरोध करायला काही उरलं नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांच्या जंगी स्वागतावर आता भाजप नेत्यांनी आक्रमक टीका केली आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेना वाद चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं

 “गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक

 मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं

“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?” 

“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत”