मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजमध्ये सध्या जोरदार राजकीय युद्ध रंगलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र पाठवल्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत असल्यानं वाद वाढला. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीनं कारवाई केल्यानंतर हा वाद वाढल्याचं दिसत आहे. राऊत यांनी भाजपवर पत्राच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत यांनी जहरी टीका केली आहे. फडणवीस यांच्या मदतीनंच केंद्रीय तपास यंत्रणा आमच्यावर कारवाई करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील भाजप नेते आमच्या मंत्र्यांना घाबरवत आहेत. आज हे मंत्री जेलमध्ये जातील, उद्या ते मंत्री जातील असं सांगत आहेत. पण आम्ही घाबरणार नाहीत, असं राऊत म्हणाले आहेत.
केंद्र सरकारच्या जीवावर धमक्या देत आहेत. मात्र महाराष्ट्रात जे सरकार आहे ते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे हे तुम्ही ध्यानात घ्या, असा इशारा राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
संजय राऊत हे 15 तारखेला शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. परिणामी अवघ्या देशाचं लक्ष आता राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडं लागलं आहे.
आम्ही खूप दिवस बर्दाश्त केलं आहे आता तुम्हाला आम्ही बरबाद करू, असा निर्वाणीचा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे. एकेकाळचे मित्र असणारे भाजप आणि शिवसेना सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर
राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान
“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात”
राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’