मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली.
आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्याने ते मुख्यमंत्र्यासोबत गेले होते. ऑइल पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी आदित्य ठाकरेंना उतरविण्याचा प्रकार केल्याच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे भडकले होते. या प्रकारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या सुरक्षा यंत्रणाने आदित्य ठाकरे यांना थांबवलं त्या सुरक्षा यंत्रणा आज चीनच्या बॉर्डरला पाठवायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे या राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर अशा प्रकारचे व्यक्तींकडून स्वागत केले जाते. मुंबईत येऊन तुम्हाला जर ठाकरे माहित नसतील तर हे अवघड आहे हे जाणून बुजून केला जात आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांनीही या प्रकरणावरूनही भाजपवर निशाणा साधला आहे.
हा एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडवल्या जात आहेत हे मी प्रकर्षाने सांगू इच्छितो, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले…
“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत”
‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा