“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”

जळगाव | शिवसेनेला सुरूंग लावत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत फुटला. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख व खासदारही शिंदे गटात सामील झाले.

शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या अधिक असली तर अजूनही काही शिवसैनिक आहेत जे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर आता शिवसेनेचे दोन गट पडले असून यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे जळगावचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सावंत यांनी एकनाथ शिंदेंना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ओपन चॅलेंज देखील दिलं आहे.

काकांची पुण्याई आणि शिवसेनेच्या विचाराच्या जोरावर जे पुढे आले आहेत ते आता एकनाथ शिंदेंना बाप म्हणत आहेत, हे त्यांचं दुर्दैव. त्याच किशोर पाटलांऐवजी पाचोऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी, असं आव्हान सावंत यांनी दिलं आहे.

एकनाथ शिंदेंनी इथे निवडणुक लढवली तरी शिवसैनिकच विजयी होतील. असं नाही झालं तर बापाचं नाव लावणार नाही, असा विश्वास देखील सावंत यांनी व्यक्त केला आहे.

पाचोरा येथील पक्षाच्या मेळाव्यात सावंत यांनी शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटलांना विशेष लक्ष केलं. ज्यांना प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्यातील फरक ओळखता येत नाही तेच आज हिंदुत्वाचे धडे गिरवत आहेत, असा टोला सावंत यांनी किशोर पाटलांना उद्देशून लगावला आहे.

दरम्यान, जे सोडून गेले ते कावळे आणि उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे तेच शिवरायांचे खरे मावळे, अशी टीकाही संजय सावंत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची करून दिली आठवण

हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…

पंधरा वर्षांपूर्वीही आजच देशाला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती, मुर्मू इतिहासाची पुनरावृत्ती करणार?,

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त

कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ