नवी दिल्ली | राजस्थानचे आमदार संयम लोढा यांनी स्वतःला आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना गांधी-नेहरू घराण्याचे ‘गुलाम’ म्हणून संबोधित केलं आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
“ते गांधी-नेहरू कुटुंबाचे गुलाम आहेत” असा उल्लेख करणार्या सदनातील एका सदस्याच्या विधानानंतर संतप्त झालेल्या संयम लोढा यांनी फटकारलं.
होय आम्ही नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे गुलाम राहू. कारण, हे राष्ट्र नेहरू-गांधी कुटुंबानं निर्माण केलं आहे, असं लोढा म्हणालेत.
सभागृहातील इतर सदस्यांनी संयम लोढा यांच्यावर झटपट प्रत्युत्तर दिलं आणि ‘गुलामगिरी’बद्दल त्यांचं खोचकपणे ‘अभिनंदन’ही केलं. तुमच्या गुलामगिरीबद्दल अभिनंदन, सभागृहातील आणखी एका सदस्यानं म्हटलं.
लोढा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसवर टीका करताना भाजपचे शेहजाद पूनावाला यांनी ट्विटरवर म्हटलंय की, भारताची निर्मिती नेहरू गांधी कुटुंबाने केली आहे का? पुन्हा एकदा सोनिया/राहुल/इंदिरा म्हणजे भारत?, असा सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत”
Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा
“सतेज पाटील हा माणसं खाणारा माणूस, विरोधकांनो सावध राहा”
Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल