अमिताभ बच्चन तुम्हीसुद्धा??? हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीचे गंभीर आरोप

सध्या जगभरात #MeToo चळवळीचा चांगलाच बोलबाला आहे. सिनेसृष्टी तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांची यामध्ये आता भर पडली आहे. हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीने अमिताभ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भवनानी यांच्या आरोपांमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. 

नेमका काय आहे प्रकार?

वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी #MeToo मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली होती. कोणत्याही महिलेसोबत असं वर्तन व्हायला नको, असं त्यांनी म्हटलं होतं. 

सपना भवनानी यांचं ट्विट-

अमिताभ बच्चन यांच्या या मुलाखतीवर सपना भवनानी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या पोस्टवर चक्क आक्षेप घेतला आहे.

कदाचित हे जगातील सर्वात मोठं खोटं आहे. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलाय. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही लवकरच संपेल. सत्य बाहेर येईल, असं सपना भवनानी यांनी म्हटलंय. -सपना भवनानी, हेअरस्टायलिस्ट

 

सपना भवनानी लैंगिक शोषणाच्या बळी?

सपना भवनानी यांच्या ट्विटनंतर अनेकांना त्याच लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या की काय? असं वाटू लागलं. त्यावर सपना भवनानी यांनी तात्काळ ट्विट केलं आहे. 

अमिताभ यांच्या गैरवर्तनाचा कोणताही अनुभव मला आलेला नाही. मी स्वतः त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्या महिला पुढे येतील अशी मला आशा आहे, असं सपना भवनानी यांनी म्हटलं आहे.