मुंबई | अभिनेत्री आणि डान्सर सपना चौधरीचा एक डान्स व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओमध्ये ‘तेरे आँखो का ये काजल’ या गाण्यावर तिने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे.
सोनोटेक कंपनीच्या युट्युब चॅनेलवर तिने हा व्हीडिओ प्रकाशित केला आहे. भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये धमाल करणाऱ्या सपनाचा हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला दिसून येत आहे. आतापर्यंत या व्हीडिओला 47 कोटींच्या वर हिट्स आलेल्या आहेत.
सपनाचा हा व्हीडिओ आतापर्यंतचा सर्वांत जास्त पाहिला गेलेला व्हीडिओ आहे. यावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लागू शकतो. या व्हीडिओमध्ये सपनाने दिलखेचक डान्स स्टेप केल्या आहेत.
सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरूवात एका ऑर्केस्ट्रामधून केली होती. मात्र आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिने भोजपुरी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये आपलं स्थान बळकट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…
-अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र
-20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत