देश

राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

नवी दिल्ली : हरियाणातील प्रसिद्ध डान्सर, जिच्या एका अदाकारीने भलेभले घायाळ होतात ती सपना चौधरी राजधानी दिल्लीत दाखल झालीय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ती भेट घेणार असल्याचं कळतंय. सपना चौधरी काँग्रेसध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या प्रकाराची सध्या एकच चर्चा आहे. 

काँग्रेससोबत सपनाचं नाव जोडलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपण काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याचं सपनानं याआधीच जाहीर केलं आहे. राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. गांधी घराण्यानं 60 वर्षे हा देश सांभाळला त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, असं सपनानं म्हटलं आहे. 

मी काँग्रेसला पाठिंबा देते म्हणजे माझ्या चाहत्यांनीही तसंच करावं असं माझं म्हणणं नाही. त्यांना ज्यांना कुणाला पाठिंबा द्यायचा असेल तो द्यावा. माझं काँग्रेस प्रेम आणि माझ्या कलेचा काहीही संबंध नाही, असंही सपनानं म्हटलं आहे. 

सपना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करेल. तिला आगामी निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट मिळू शकतं, असंही सांगितलं जातंय. 

IMPIMP