मुंबई : खुप कमी काळात प्रसिद्धी मिळणाऱ्या स्टार किड्स मध्ये सध्या सारा अली खान ही अग्रेसर आहे. सारा तिच्या अभिनयासोबतच तिच्या एअरपोर्ट लुकसाठीही खुप फेमस आहे. तिला भेटायला आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते नेहमीच गर्दी करतात, पण ह्या वेळेस तिच्यासोबत फोटो काढण्याचा फायदा तिच्या एका चाहत्याच्या आई-वडीलांना झाला आहे.
काही दिवसांपूर्वी सारा अली खानला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी एका चाहत्याने तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा धक्का साराला लागला. या प्रकारानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी या चाहत्याला खरं-खोटंही सुनावलं. मात्र हा व्हीडिओ पाहून एका आई-वडीलांना त्यांचा हरवलेला मुलगा सापडला.
साराच्या व्हीडिओमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या या मुलाचं नाव अजय असून तो 17 वर्षांचा आहे. अजय काही दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घर सोडून पळून गेला होता. घरातल्यांनी अजयचा शोध घेतल्यानंतरही त्याचा कोठेच पत्ता लागत नव्हता. मात्र साराच्या या व्हिडीओमुळे अजयच्या घरातल्यांना त्यांचा हरवलेला मुलगा सापडला आहे.
दरम्यान, हा व्हीडिओ पाहून अजय सुखरुप असल्याची आम्हाला खात्री झाली आहे. त्याला व्हीडिओमध्ये पाहिल्यानंतर आम्ही ही माहिती पोलीसांना सांगितली. अजय 10 वीला आहे. काही दिवसांपूर्वी तो शाळेत गेला आणि घरी परत आलाच नाही. तो एटीएम घेऊन मुंबईमध्ये पळून गेला, असं अजयच्या वडिलांनी सांगितंल आहे.
महत्वाच्या बातम्या-
मला माझं स्वातंत्र्य परत द्या; IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने देशात खळबळ- https://t.co/m9lyKti1TP #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019
हिम्मत असेल तर माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा- सुप्रिया सुळे https://t.co/1rfnA3RXer @supriya_sule
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019
काश्मिरी महिलेची विमान प्रवासात राहुल गांधींजवळ भावनांना मोकळी वाट https://t.co/DrHi8vq0tR @RahulGandhi @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019