“गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं की माझ्या आई-बाबांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला”

मुंबई | मी देवाचे आभार मानते की माझ्या आई-बाबांचा घटस्फोट झाला. मला नाही वाटत की जर दोन लोक एकमेकांसोबत आनंदी नसतील तर त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, असं अभिनेत्री सारा अली खानने म्हटलं आहे.

सारा अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे. गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं की माझ्या आई-बाबांनी घटस्फोचा निर्णय घेतला, असं साराने म्हटलं आहे.

माझ्या वडिलांवर माझं खूप प्रेम आहे. पण आई माझी प्रेरणा आहे. आम्ही एकमेंकींशी मैत्रिणीसारखे वागतो. ती माझं सर्वस्व आहे, असं सारा अली खानने सांगितलं आहे.

दरम्यान, गुदमरत जगण्यापेक्षा माझ्या आई-बाबांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला ते बरंच झालं. एका दु:खी घरापेक्षा आता माझ्याकडे दोन आनंदी घरं आहेत, असं साराने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-सोशल मीडिया अकाऊंटला ‘आधार कार्ड’ जोडून घेण्यावर मोदी सरकारचा मोठा खुलासा!

-‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’; गायक विशाल दादलानीने लगावला मोदींना टोला

-मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

-67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

-एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे