सरपंच निवडीसंदर्भातला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

मुंबई |  राज्य मंत्रिमंडळाची कॅबीनेट बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी कॅबीनेटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तत्कालिन फडणवीस सरकारचा सरपंच निवडीसंदर्भातला निर्णय ठाकरे सरकार रद्द केला आहे. जनतेतून होणारी सरपंच निवड अखेर ठाकरे सरकारने रद्द केली आहे.

9 हजार ग्रामपंचायतींनी विरोध करून देखील ठाकरे सरकारने जनतेतून होणारी सरपंच निवड रद्द केली आहे. सरपंच परिषद आणि राज्यातील 9 हजार ग्रामपंचायतींनी जनतेमधूनच सरपंच निवड व्हावी, अशी मागणी केली होती. तसा पत्रव्यवहार देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांशी केला होता. 9 हजार ग्रामपंचायतींकडं आणि सरपंच परिषद यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शासनाने घेतलेला हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उद्यापासून महाराष्ट्रात उमटलेले दिसतील, असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

तत्कालिन फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवड व्हावी यासाठी मंत्रिमंडळात बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय आता ठाकरे सरकारने रद्द केला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाने आता यावर वादंग उठण्याची शक्यता व्यक्त केली जातीये.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशातील सर्व बॉम्बस्फोटांमागे RSS चा हात आहे- नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील

-मोदी आणि शहा खुनी आहेत…. तसे माझ्याकडे पुरावे- न्या. कोळसे पाटील

“दिल्लीकरांसाठी मी जीवन त्यागलं अन् भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं फार दु:ख वाटतंय”