आता सरपंचाची निवड जनतेतून होणार नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीमधून करण्याचं विधेयक मंजूर झालं आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं आहे. सरपंचांची निवड ग्रामपंचायतीमधून करण्याच्या राज्य सरकराने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर आज हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

9 हजार ग्रामपंचायतींनी विरोध करून देखील ठाकरे सरकारने जनतेतून होणारी सरपंच निवड रद्द केली आहे. सरपंच परिषद आणि राज्यातील 9 हजार ग्रामपंचायतींनी जनतेमधूनच सरपंच निवड व्हावी, अशी मागणी केली होती. तसा पत्रव्यवहार देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांशी केला होता. 9 हजार ग्रामपंचायतींकडं आणि सरपंच परिषद यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं.

सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचं विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं. ते विधेयक आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलं असून आता विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धवजी, क्या हुआ तुम्हारा वादा; मुनगंटीवारांनी करून दिली त्या आश्वासनाची आठवण

-“फडणवीस गजनी झालेला दिसतोय; भाजपचं आजचं आंदोलन म्हणजे अपयशाचा आरसा”

-आमच्या कामांना स्थगिती देऊ शकता पण जनतेच्या मनातील स्थानाला नाही- फडणवीस

-शिवसेनेने घातल्या असेल बांगड्या पण आम्ही घातल्या नाहीत; पठाणांच्या वक्तव्यावरून फडणवीस आक्रमक

-पुन्हा मैदानात जाऊन राज्य काबीज करेन; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार