पुणे महाराष्ट्र

रावण टोळीतील ‘ससा’ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात दहशत पसरवणारा आणि रावण गँगचा मुख्य सूत्रधार असणारा ‘ससा’ याला पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. रावण गँगचा प्रमुख आणि त्याच्या खुनानंतर ससा हा गँगचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. 

आरोपी ससा याच्यावर पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल करणे, मारामारी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2019मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. 

जुलै 2018 मध्ये आरोपीने पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यासामोर भरदिवसा गाड्यांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली होती. 

काही महिन्यांपूर्वी शहरातून तडीपार करण्यात आलेला ‘ससा’ आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात आला असल्याची माहिती ‘अँटी गुंडा स्कॉड’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. 

शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या पथकाची स्थापना केली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्याकडे या पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

IMPIMP