उदयनराजेंविरोधात अजित पवार उमेदवार?; बारामतीतून पार्थ लढणार???

बारामती | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

अजित पवार साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादीने अजित पवारांनाच त्यांच्या विरोधात उतरण्याची खेळी चालवली असल्याचं कळतंय. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजीनामा देऊन अजित पवार सातारा लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रीत करतील, असं बोललं जातंय.

अजित पवार साताऱ्यातून लोकसभा लढल्यास बारामतीची जागा रिकामी होईल, त्याजागी त्यांचे पूत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती असू शकते.

दरम्यान, साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव देखील चांगलंच चर्चेत आहे. मात्र साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अजित पवार तिथून लढतील, अशी शक्यता आता बळावू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-