आणखी एक घराणेशाही; या नेत्यानं जाहीर केली पुतण्याची उमेदवारी!

कोल्हापूर |  विविध राजकीय पक्षांना घराणेशाहीची कीड लागलीये अशी चर्चा निवडणुका जवळ आल्या की सुरू होतात. आता देखील कारणंही तेच आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी त्यांच्या पुतण्याची म्हणजेच ऋतुराज पाटील यांची काँग्रेसकडून आगामी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. महत्वाचं म्हणजे सतेज पाटील यांच्या या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी हजेरी लावली होती.

आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या निर्णयास माझा पाठिंबा आहे, असं शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून पक्ष विसरुन संजय मंडलिक हे काँग्रेसच्या मंचावर आले होते.

दरम्यान, सगळेच राजकीय पक्ष सभा-संमेलनांमधून घराणेशाहीवर आसूढ ओढत असतात मात्र प्रत्येक पक्ष आपापल्या परीने घराणेशाही पोसत असल्याचंच वारंवार दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-