कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, महाराज ही फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही त्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही

मुंबई | बेळगावमधील जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने मोठा गदारोळ झाला होता. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला होता. मात्र हे कुठे आता शांत होणार असं वाटत असताना कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षतीश जारकीहोळी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. बेळगाव जिल्ह्यात स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींमध्ये महाराष्ट्राचं कोणतंही योगदान नाही, असं सतीश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील लोकांनी कर्नाटकमधील स्थानिक विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही आणि तसा त्यांना नैतिक अधिकारही नसल्याचं सतीश जारकीहोळींनी म्हटलं आहे. बेळगावात महाराजांचे अनेक पुतळे आहेत. मकनमर्डी क्षेत्रातील कडोलीमध्ये 50 लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी स्वत: त्यात 15 लाख रुपये दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वादंग होण्याची शक्यता आहे. कारण महारांजांच्या पद स्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पावन झाली आहे. महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतू सतीश जाकरीहोळी यांनी थेट महाराष्ट्रवासीयांनाच नाक खुपसू नये असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

‘एका तासातच मोदींना ठार करेन’; चक्क मोदींना जीवे मारण्याची धमकी!

राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही- युजीसी

“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”

…म्हणून सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंग आता ईडीच्या रडारवर!