मुंबई | मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही आणि माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संकेताची वाट पाहत आहे, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.
मी अशा शेतकऱ्यांबद्दल बोललो जे केंद्र सरकारच्या बाजूने गेले असते आणि शेतकरी आंदोलन झाले नसते. 700 शेतकरी मरण पावले आहेत आणि त्यांच्याबाबत साधा शोक संदेश पाठवला गेला नाही हे चुकीचं आहे, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.
उलट मोदी सरकारने नंतर माफी मागून हे विधेयक मागे घेतले. त्यामुळे मी नेहमीच जनतेच्या बाजूने बोललो आहे आणि अजूनही बोलत आहे, असं त्यांनी म्हटलंय.
केंद्र सरकार कमालीच्या उद्दामपणात जगत आहे. त्यामुळे यापेक्षा वाईट काहीही घडण्याआधीच काहीतरी करा. बॅकफूटवर या आणि योग्य निर्णय घ्या, असं म्हणत मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून माझ्या खिशात राजीनामा आहे. ज्या दिवशी मोदींकडून संकेत मिळतील, त्या दिवशी मला हटवावं लागणार नाही. मीच माझा निर्णय घेईन, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, सत्यपाल मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या न पटणाऱ्या गोष्टींवर टीका करतात. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा
‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
‘ती गोष्ट मला चार महिन्यांपूर्वीच समजली होती’; बंडखोर आमदारांबाबत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट
कारवाईच्या आदेशानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज, म्हणाले…