“…तर पद सोडण्यासाठी मी एक मिनिटही वाया घालवणार नाही”

जयपूर | शेतकरी आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दत ते काही बोलले नाहीत. मी यापूर्वीही सांगितलंय की शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळीही येऊन बसेन, असं मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.

सत्यपाल मलिक यांनी रविवारी देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. ते जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, जर त्यावर मी काही वक्तव्य केलं तर त्यावर वाद होतील. राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत, जे याच शोधात असतात की मी काही बोलेन आणि हटवलं जाईल, असंही मलिक यांनी म्हटलंय.

मला दोन तीन जणांनी राज्यपाल बनवलं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलल्यास त्यांना समस्या निर्माण होतील, मला याचा अंदाज आहे. परंतु जर त्यांनी काही समस्या आहेत असं सांगितलं तर पद सोडण्यासाठी मी एक मिनिटही वाया घालवणार नाही, असंही सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं.

इतकं मोठं आंदोलन देशात आतवर कधीही चाललं नाही. यामध्ये 600 शेतकरी शहीद झाले. इथे कुत्रंही मेलं तरी दिल्ल्याच्या नेत्यांचा शोक संदेश जातो. परंतु 600 शेतकऱ्यांचा प्रस्ताव लोकसभेत पारित जाला नाही, असं मलिक यांनी म्हटलंय.

मागील अनेक दिवसांपासून सत्यपाल मलिक मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करताना दिसतायत. शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार तसेच काश्मीमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वी तिखट भाष्य केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य तसेच अंबानी यांच्या फाईल्स मंजूर करण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं होतं.

काश्मीरला गेल्यानंतर माझ्यासमोर दोन फायली मंजुरीसाठी आणल्या गेल्या. एक अंबानी आणि दुसरा आरएसएसशी संबंधित होता, जो मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होता.

तुम्हाला प्रत्येक फाईल क्लिअर करण्यासाठी 150-150 कोटी रुपये मिळतील, असं मला सचिवाने सांगितलं होतं, अशी माहिती मलिक यांनी 22 ऑक्टोबर रोजी एका भाषणादरम्यान दिली होती.

दरम्यान, गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरुन हटविण्यात आलं. हकालपट्टी झाली. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केलं आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात’; राजू शेट्टींचा थेट इशारा 

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”