“भारतीय संघाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यावी”

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या विंडिजमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून दुसरा आणि अखेरचा सामना 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यातून भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने माघार घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पण भारतीय संघाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यायला हवी, असं वक्तव्य माजी कर्णधार सौरव गांगुली याने केलं आहे.

धोनी शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेट खेळणार नाहीये. आताच्या त्याच्या वयाकडे पाहता तो फार काळ मैदानावर क्रिकेट खेळताना दिसेल असे वाटत नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

प्रत्येक खेळात महान खेळाडूच्या निवृत्तीची एक वेळ येते. हा खेळ आहे. क्रिकेटमध्येदेखील तेंडुलकर, लारा, ब्रॅडमन यांना निवृत्ती स्वीकारावी लागली. हा खेळाचा नियमच आहे आणि तो प्रत्येकाला पाळावाच लागणार आहे, असंही सौरव गांगुली म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-