खेळ

टीम इंडियाला ‘ही’ चूक महागात पडली- सौरव गांगुली

मॅनचेस्टर | वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.

ऋषभ पंत बॅटिंग करत असताना धोनीलाही बॅटिंगला पाठवायला पाहिजे होतं. त्यावेळी धोनी मैदानात असता तर हवेच्याविरूद्ध दिशेने शॉट मारायला दिला नसता, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

धोनीने पंतला फास्ट बॉलवर आक्रमक खेळी करायला सांगितलं असतं, कारण मिड ऑन आणि मिड ऑफ वरती होते, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

धोनीने वरच्या क्रमांकावर बॅटिंग करायला पाहिजे होती. कारण धोनीने त्यावेळी विकेट पडू दिल्या नसत्या, असं गांगुली म्हणाला आहे.

मागच्या दिड वर्षामध्ये निवड समितीने मधल्या फळीत बरेच बदल करून मोठी चूक केली, असं गांगुलीने म्हटलं आहे. 

IMPIMP