पुणे महाराष्ट्र

…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!

पुणे |  पुण्यातील काही भागात ‘सविता भाभी…तू इथंच थांब’, असे होर्डींग्स लावण्यात आले होते. यावरुन सगळेच जण बुचकळ्यात पडले होते. हे होर्डींग्स का लावण्यात आले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर या मागचं खरं कारण समोर आलं आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे होर्डींग्स पुण्यातील अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, हॅलो मी सविता… तुझी सविता… तुम्हाला माहित असलेली पण तुम्ही कधीही न पाहिलेली, अशा प्रकारचा संवाद आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होर्डींग्स लावण्याची युक्ती लढवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘शिवडे… आय एम सॉरी’ असे पोस्टर पिंपरीत सगळीकडे झळकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक…. मासिक पाळी नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

-1 एप्रिल ठरवणार ‘ठाकरे सरकारचं भविष्य’; प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी

-सचिनने व्हॅलेंटाईनदिनी जागवली पहिल्या प्रेमाची आठवण!

-दानशूर भिकारी….. मंदिराला दिले 8 लाख रूपये!

-‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्लॅन काय विचारताच आदित्य ठाकरे लाजले; म्हणाले…