बॉयफ्रेंडसोबत बायकोला नको त्या अवस्थेत पाहिलं; नवऱ्यानं बॉम्बने घर उडवलं…!

अयोध्या |  आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने चिडलेल्या नवऱ्याने घरचं बॉम्बने उडवून दिलं. ही धक्कादायक घटना अयोध्येच्या काशिराम कॉलनीत घडलीये. घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजलीये.

मिळालेल्या माहितीनुसार पत्नी तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. याचा राग पतीच्या मनात अनेक दिवसांपासून होता. अनेकदा तो पत्नीच्या घरापाशी जाऊन तिच्याबाबत माहिती घेई. सवयीप्रमाणे तो काही दिवसांपूर्वी पत्नीच्या घरी गेला आणि नको त्या अवस्थेत त्याने पत्नीला तिच्या मित्रासोबत पाहिलं.

त्यानंतर त्याने घरावर बॉम्बहल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तो निर्णय तडीस नेला देखील…! या हल्ल्यामध्ये 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना इस्पितळात दाखल केलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत प्रचाराला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी केजरीवालांवर घेतलं चांगलंच तोंडसुख

-‘त्या’ वक्तव्यावर शेलार म्हणतात, मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही!

-मालिकेने आयुष्याची शिदोरी दिलीये… काळजात जपून ठेवण्यासारखी; अमोल कोल्हेंचं भावूक ट्वीट

-“जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला ‘दिलासा’ देणारी मुलाखत अपेक्षित होती”

-शेती हवामानावर अवलंबून असल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं- शरद पवार