जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम

मुंबई | ‘बिग बॉस 13’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आज या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अद्याप देखील त्याच्या चाहत्यांचा सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही.

सिद्धार्थने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अगदी कमी वेळात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धार्थने एक अभिनेता म्हणून खूप नाव कमवलंच आहे परंतु त्याबरोबरंच त्याने एक उत्तम माणूस म्हणून देखील अनेकांच्या ह्रद्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सिद्धार्थने मृत्यूच्या केवळ सहा दिवस अगोदर जिवनाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. काही फोटोज शेअर करत तो आयुष्य खूप स्वस्त झालं आहे, असं म्हटला होता. सिद्धार्थची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.

मृत्यूपूर्वी सहा दिवस अगोदर सिद्धार्थने एक उदात्त कार्य केलं होतं. ट्वीटरवरील एका पोस्टमुळे सिद्धार्थच्या या कार्याची माहिती मिळाली होती. सिद्धार्थ भटक्या कुत्र्यांसाठी एक मोहिम राबवत होता. तो प्राण्यांच्या खाण्याची पूर्ण व्यवस्था करतो.

सिद्धार्थने याबद्दल एका व्यक्तीला माहिती दिली होती. त्या व्यक्तीने पोस्ट करत सिद्धार्थचे आभार मानले होते. त्यानंतर त्या व्यक्तीची पोस्ट शेअर करत सिद्धार्थ म्हणाला की, असे एक जग आहे जिथे मानवी जीवन इतके स्वस्त झाले आहे. हे पाहणे आनंददायी आहे. भटक्या कुत्र्यांबद्दल दया करा.

दरम्यान, सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती. सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.

डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूमागे आहे सुशांतच्या मृत्यूचं रहस्य?

सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर

सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शहनाजला असहय्य, वडिलांनी दिली तिच्या प्रकृतीबद्दल माहिती

कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन