Top news मनोरंजन

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक चित्रपटांचं शूटिंग थांबलं होतं. मात्र, आता सरकारनं परवानगी दिल्यानं अनेक चित्रपटांची रखडलेली शूटिंग्ज पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. कोरोनामुळे सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाचं शूटिंग देखील थांबलं होतं. खूप मोठ्या गॅप नंतर राधेचं शूटिंग देखील पुन्हा सुरू झालं आहे.

सध्या इंडस्ट्रीत राधे चित्रपटामुळे अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता सलमान खान या दोघांचीच चर्चा चालू आहे. सलमान खाननं दिशाला राधे चित्रपटात काम करण्याबाबत विचारलं तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता श्रद्धानं सलमानला होकार दिला आहे. यामुळे सध्या हे दोघे चर्चेत आहेत.

सलमान खानसोबत काम करणं हा अतिशय उत्तम अनुभव आहे. सलमान कडून खूप काही शिकायला मिळतं. तो खूप गोड आहे, असं म्हणत दिशानं सलमानला चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला आहे.

तसेच सलमान खान बरोबरच प्रभू देवा सुद्धा या चित्रपटाचा एक भाग असणार आहे, हे ऐकून मला खूप जास्त आनंद झाला आहे. राधे चित्रपटात या दोघांबर काम करणं हा खूप भारी अनुभव असेल, असं म्हणत दिशानं आपला आनंद व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे तब्बल साडे सहा महिने राधेचं शूटिंग थांबलं होतं. इतक्या दीर्घ कालावधीनंतर राधेच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानं सेटवरील सर्वच जण खूप खूष दिसत आहेत. राधे चित्रपटात सलमान आणि दिशाचं एक रोमँटिक गाणंही आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या सेटवर याच गाण्याचं शूटिंग चालू असल्याची माहिती मिळली आहे.

राधे चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमामध्ये सलमान खान दिशा पटाणीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. शिवाय प्रभू देवाचा हटके डान्सही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येईल यावर सर्वांचीच नजर लागून आहे.

दरम्यान, अभिनेत्री दिशा पटानी सतत कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीविषयी बोललं जातं होतं. तर मधल्या काळात टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून दिशा चर्चेत होती. मात्र, आता दिशा सलमान खानच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यावेळी सुशांतच्या मृ.त्यू संबंधित सलमान खानवरही अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र, आता सलमान खान वादाच्या भोवऱ्यातून बाहेर निघाला असून त्यानं पुन्हा जोमानं शूटिंगला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?