विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी; सयाजी शिंदेंचं मत

पुणे | झाड म्हणत नाहीत की हा भ्रष्टाचारी आहे. पण खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र उपाशीपोटी मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. खाऊन जास्त आजार होतात. त्यांमुळे खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि मरू द्या, असं प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

वृक्ष संमेलन संकल्पना जिल्ह्यापुरती असून जिल्ह्यात वृक्षसुंदरीच किताब दिला जाणार आहे. विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी. प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी वेगवेगळ्या संमेलन करण्याचे संकल्पना आहे, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. पुण्यात सयाजी शिंदे यांनी लिहिलेल्या ‘तुंबारा’ पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला.

आतापर्यंत घरांसाठी लोकांनी झाडं तोडली. मात्र आता घर पाडून झाडं लावायला पाहिजे, झाडं लावणं हा थँक्सलेस जॉब असून इथं प्रसिद्धी मिळत नाही. वृक्ष हे तपस्वी ऋषीसारखे आहेत. मात्र तपश्चर्याला बसलेल्या ऋषींची कत्तल केली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जनजागृतीसाठी वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील डोंगरावर 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी वृक्ष संमेलन होणार आहे. यामध्ये वडाचं झाड हे या संमेलनाचं अध्यक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?’;मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांचा सुटला तोल

-“माफी मागा नाहीतर 23 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन”

-“काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेना भूमिका घ्यायला कचरतेय”

-काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी प्रदर्शित केलेल्या जाहिरनाम्यात केली ‘ही’ मोठी घोषणा

-पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक; यावर्षीच्या बजेटमध्ये केली तब्बल 600 कोटींची तरतूद