SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…

मुंबई | नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी आणखीन बराच कालावधी आहे. अशात विविध बॅंका आपल्या नियमांमध्ये बदल करताना दिसत आहेत. परिणामी याचा फायदा आणि तोटा हा ग्राहकांना होणार आहे

सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक भारतीय स्टेट बॅंकेनं आपल्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचं सध्या समोर येत आहे. या निर्णयाचा परिणाम एसबीआयच्या करोडो ग्राहकांवर होणार आहे.

एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

नवीन नियमाअंतर्गत आता ग्राहकाला या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आधी ओटीपी टाकणे अनिवार्य आहे. बँकेच्या या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना ओटीपी शिवाय पैसे काढता येणार नाहीत.

आता पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, तो टाकल्यानंतरच ते एटीएममधून पैसे काढू शकतील. परिणामी ही माहिती सर्व ग्राहकांच्या फायद्याची आहे.

बॅंकेनं हा नियम सुरक्षित व्यवहार व्हावा यासाठी लागू केला आहे. बॅंकेच्या या निर्णयानं ग्राहकांना बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना सोबत मोबाईल पण ठेवावा लागणार आहे.

ग्राहकांना सध्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अधिक फायदा देण्याचा बॅंकेचा मानस आहे. परिणामी डिजिटल स्वरूपातील व्यवहारात कसलीही अडचण भासणार नाही याची काळजी सध्या बॅंकेकडून घेण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या एटीएममधून पैसे काढताना अनेक गैरव्यवहार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी बॅंकेनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अशाप्रकारचा निर्णय इतर बॅंकादेखील घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”