SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी

नवी दिल्ली : तुमचं खातं स्टेट बॅंक ऑफ इंडियात (SBI) असेल, तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. SBI ने येत्या 1 डिसेंबरपासून आपल्या लोकप्रिय असलेल्या 4 महत्वाच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेट बँकिंग, लोन पेन्शन सेवा, SBI Buddy आणि पेन्शनसाठी लागणारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची संधी, या सेवा आता बंद होणार आहेत.

नेमक्या काय होत्या या 4 सुविधा ??

…तर नेट बँकिंग सुविधा बंद होऊ शकते-

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला नसेल तर आता तुमची इंटरनेट बॅंकिंग सुविधा बंद होवू शकते. या संबंधी वारंवार बॅंकेेकडूऩ खातेदारांऩा मेसेजही पाठवला जातोय. ज्या ग्राहकांनी अजूनही आपला मोबाईल नंबर बॅंकेशी लिंक केलेला नसेल तो येत्या 2 दिवसात त्यांनी तो लिंक करून घ्यावा, अथवा यापुढे तुम्ही इंटरनेट बॅंकिंग सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. 

पेन्शनधारकांना मिळणारी कर्जाची सेवा-

यापूर्वी बॅंकेतर्फे पेन्शनधारकांना सणासुदीला कर्ज देण्याची सुविधा होती. ही सुविधा ज्यांची पेन्शन SBI च्या शाखेत येत होती त्या ग्राहकांसाठीच होती. या योजनेअंतर्गत कुठल्याही शुल्काशिवाय कर्ज दिले जायचे. ही सुविधा आता 30 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.

SBI Buddy मोबाईल अॅप-

आपलं मोबाइल वॅालेट (SBI Budddy) SBI येत्या 1 डिसेंबरपासून बंद करणार आहे. बॅंकेच्या म्हणण्यानुसार ही सेवा अगोदरच बंद करण्यात आलेली आहे. ज्या ग्राहकांचे पैसे या वाॅलेटमध्ये आहेत ते परत कसे मिळणार? याबाबत बॅंकेकडूऩ कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं ऩाही.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अखेरची संधी-

तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी निवृत्त असेल आणि त्यांची पेन्शन SBI च्या कुठल्याही शाखेत येत असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांची पेन्शन थांबवली जाऊ शकते.