SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार

मुंबई | 1 फेब्रुवारीपासून अधिक शुल्क भरावे लागणार असल्याने आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

SBI ने 1 फेब्रुवारीपासून IMPS करण्याचे नियम बदलले आहेत. यामध्ये तुम्हाला एका बाजूला फायदा होणार आहे आणि दुसरीकडे तोटा होणार आहे.

1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS ट्रान्झॅक्शनसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे, हा 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत असेल.

SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST ​​असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहार करता येणार्‍या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती.

IMPS (Immediate payment Service) ग्राहकांमध्ये NEFT आणि RTGS पेक्षा अधिक लोकप्रिय आहे कारण ग्राहक 24 तासांत कधीही IMPS द्वारे त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकतात.

IMPS ला इमिडिएट मोबाइल पेमेंट सर्व्हिस म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी देते. ही सेवा रविवार आणि इतर सुट्ट्यांसह 24 X 7 उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या- 

पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा

लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे 

श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल 

पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये 

तरुणांसाठी मोठी बातमी; पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती