नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेदारांच्या दृष्टीने महत्वाचे 3 निर्यण बुधवारी घेतले आहेत. बचत खात्यात किमान शिल्लक राखण्याच्या नियमातून खातेदारांना मुक्त केले आहे. त्यामुळे आता बचत खातेदारांना झिरो बॅलन्स असला तरीही कोणताही दंड आकारण्यात येणार नाही.
बँकेने सर्व बचत खात्यावरील व्याजदर समान केले आहेत. तो घटवून 3 टक्क्यांवर आणला आहे. एसबीआयने निधी आधारित कर्जदारांमध्ये कपात केली आहे. यामुळे कर्जे काहीशी कमी झाली.
त्याचवेळी मुदतठेवींवरील व्याज तसेच बचत खात्यावरील व्याज कमी केले आहे. त्यामुळे बँक ठेवीदारांना फटका बसणार आहे. त्यामुळे बँकेने खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बचत खात्यातील किमान शिलकीची मर्यादा काढून टाकली आहे. आणि एसएमएस सेवाही मोफत केली आहे.
दरम्यान, बँकेच्या खातेदारांना महानगरात 3 हजार, निमशहरी भागात 2 हजार आणि ग्रामीण भागात 1 हजार रुपये किमान शिल्लक बचत ठेवावी लागत होती. नाही तर खात्यातून 5 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत होता.
स्टेट बँकेमध्ये निधी आधारित कर्जदरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे कर्ज काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत. 1 वर्ष मुदतीच्या कर्जावर एमसीएलआर 0.10 घटवून 7.85 वरुन 7.75 करण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या-
-“फक्त आजच नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे”
-कोरोनाच्या भीतीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं; दोघांवर मानसिक उपचार सुरु
-पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये आणखी एक कोरोनाचा संशयीत रुग्ण
-#Corona | राष्ट्रवादीच्या सर्व सभा, बैठका रद्द- नवाब मलिक
-सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई