दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार परिक्षा

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या महामारीमुळे सर्व उद्योगधंदे, शाळा, कॉलेज सर्व काही कित्येक महिने बंद होतं. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती. यातच आता इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे.

आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.

अनेक दिवसांपासून या परीक्षांच्या वेळापत्रकाची सर्वांनाच प्रतिक्षा होती. नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

या परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 व दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रात होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने गही परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षेला अद्याप दोन महिने असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने तीन दिवसांअगोदर दिलं होतं.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी

जाणून घ्या! गाजर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

शहनाज गीलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचा मोठा खुलासा; म्हणाला….

कंगना राणैतनं केली श्रीदेवींसोबत स्वतःची तुलना; म्हणाली…

‘…म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या’, ‘या’ मंत्र्याचा अजब दावा