1 मार्चपासून शाळा बंद? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

मुंबई | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे, शाळा, कॉलेज सर्व काही कित्येक महिने बंद होतं. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती.

कोरोनामुळे लाखो लोकांचे ब.ळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना  वेगाने हातपाय पसरु लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं महाराष्ट्रात हळूहळू सर्व शाळा, कॉलेज चालू होऊ लागली होती.

अशातच आता कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव पाहता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात काही जिह्यांतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

तसेच ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या शाळांमध्ये आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय कोरोनाचा आढावा घेण्यात येत आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं.  देशाच्या अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा फटका बसू लागल्यानं नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू सर्व देशांनी लॉकडाऊन हटवायला सुरुवात केली होती.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस

‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy