तीन दिवस शाळा-काॅलेज बंद; हिजाब वादानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

बंगळुरू | कर्नाटकच्या उडपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थीनींनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं.

या अन्यायाविरूद्ध विद्यार्थिनींनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही तरूणांनी भगवी शाल घालून राडा घातल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर हे प्रकरण सध्या देशभर गाजतंय. त्यामुळे आता कर्नाटक सरकारवर देखील टीका होताना दिसत आहे. कर्नाटकात वातावरण चांगलंच पेटल्याचं दिसताच आता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकातील सर्व शाळा आणि कॉलेज पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे.

सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा आणि कॉलेज प्रशासनासोबत कर्नाटकांच्या लोकांना शांती आणि सलोखा राखण्याचं आवाहन करतो, असं बसवराज बोम्मई म्हणाले आहेत.

मी पुढील तीन दिवसांसाठी शाळा आणि काॅलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधितांना सहकार्याची विनंती आहे, असं ट्विट त्यांनी केलंय.

कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्देवी असल्याचं मत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये, असं आवाहन देखील वळसे पाटलांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

लता मंगेशकर यांचं इंग्रजी गाणं ऐकलं का?, महेश काळेंनी शेअर केला व्हिडीओ

 “अजित पवारांनी धरणाची जागा देखील शिल्लक ठेवली नाही”

 “मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ‘या’ शहरात लतादीदींचं भव्य स्मारक उभारू”

 “नाना तुम्हाला एवढंही सांगतोय, अंगावर आला तर शिंगावर घेऊ”

“हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान, पंतप्रधान मोदींनी तात्काळ माफी मागावी अन्यथा…”