‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

मुंबई | 2020-21 शैक्षणिक वर्षात फीवाढ न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाची एकूण फी एकरकमी न मागण्याचेही निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ शिक्षण संस्थांना करता येणार नाही.

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षणमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

चालू शैक्षणिक वर्षाची जी फी विद्यार्थ्यांना भरायची आहे, ती एकरकमी भरण्याची सक्ती नसावी, तर टप्पाटप्प्याने भरण्याची सोयही करुन देण्याचे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी

-“महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात”

-लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा

-“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”

-दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना