‘या’ ठिकाणी शाळा बंदच राहणार, धडकी भरवणाऱ्या आकडेवारीनं चिंतेत भर

औरंगाबाद | कोरोना महासाथीच्या रोगाने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. यातच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकही त्रस्त झालेत. कोरोनाचा वाढता शिरकाव आणि वाढती रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे.

कोरोना आणि कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केेली आहे. निर्बंधही कडक केले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शाळा-महाविद्यालये पुन्हा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र काल ठाकरे सरकारनं येत्या सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शाळा-महाविद्यालये गेल्या 20 दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा सोमवारपासून शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत.

1ली ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले असून याविषयीचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे, असं शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी औरंगाबादमध्ये मात्र शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येचा आकडाही धडकी भरवणारा आहे. त्यामुळे तेथील शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये पाॅजिटिव्हीटी रेट 35% असल्यानं लगेच शाळा सुरू करता येणार नाहीत. वेट अॅन्ड वाॅचची भूमिका असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे.

पुढील आठवडाभर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  गोडसेच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले “एक कलाकार म्हणून…”

“हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाच्या बाळाचं नाव ‘चिवा’ ठेवू”

 प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतात, “दारू म्हणजे औषध, आयुर्वेदात…”

अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई