Top news देश

DTH च्या ग्राहकांना मिळत आहे चार दिवस मोफत टीव्ही पाहण्याची संधी; कसं ते जाणून घ्या!

नवी दिल्ली | D2Hच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऐरवी ज्या दिवशी आपल्या रिचार्जची अंतिम तारीख असेल बरोबर त्याच दिवशी आपला रिचार्ज संपतो. परंतू आता मात्र रिचार्ज संपला तरी आपल्याला त्यानंतर 4 दिवस टीव्ही मोफत पाहता येणार आहे.

ग्राहकांना जर चार दिवस मोफत टीव्ही पाहायचा असेल तर त्यांना एकावेळी दोन महिन्यांचा रिचार्ज करावा लागणार आहे. म्हणजे दोन महिन्यांचं सब्सक्रिप्शन केल्यावर त्यावर कंपनी कोणतेही डीसकाउंट न देता ग्राहकांना मोफत चार दिवस टीव्हा पाहता येणार आहे. या अगोदर असे मोफत दिवस हे फक्त मोठ्या रिचार्जवर मिळत होते आता मात्र दोन महिन्याच्या रिचार्जवरही आता मोफत दिवस मिळत आहेत.

कंपनीने मोठ्या रिचार्जवर ग्राहकांना एक महिन्यांपर्यंत फ्री सर्व्हिस दिली आहे. यासाठी ग्राहकांना मोठ्या कालावधीचे रिचार्ज करावे लागणार आहेत. यामध्ये तीन महिन्यांच्या रिचार्जवर 7 दिवस तर सहा महिन्यांच्या रिचार्जवर 15 दिवस मिळणार असून एक वर्षाच्या रिचार्जवर तब्बल एक महिनाभर फ्रीमध्ये आपल्याला टीव्ही पाहता येणार आहे.

दरम्यान,  कंपनी आपल्या ग्राहकांना सेट टॉप बॉक्ससाठी पाच पर्याय देत आहे यामध्ये सर्वाधिक किमतीचा म्हणजे 2499 रूपयांना अँड्रॉइड सेटटॉप बॉक्स देत आहे. तर 1799 मध्ये एचडी आरएफची इतकी किंमत आहे. D2H ची किंमत 1499 आहे पंतू आपल्याल जर यामध्ये एचडी हवा असेल तर त्यासाठी ग्राहकांना 1500 रूपये भरावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

रणवीर रेपिस्ट तर दीपिका सायको आहे; कंगना रनौत पुन्हा भडकली

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश

‘तहसीलदार महिलेच्या पतीकडून माझ्या जिवाला धोका आहे’; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जगातील एकमेव देश, जिथे गेल्या 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

शिक्षकानं मुलीला शिकवणीसाठी बोलवलं, अन् केला अत्यंत धक्कादायक प्रकार