नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ‘हे’ नियम बदलणार

नवी दिल्ली | नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण नवीन वर्षीत काही नियमांमध्ये बदल होणार. याचा परिणाम थेट सामान्यांवर होणार आहे. यातील महत्वाचा बदल म्हणजे डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम लागू करणार आहे. तुम्ही जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नवीन वर्षात ऑनलाइन कार्ड पेमेंटबाबत नियम बदलत आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेबाबत हा नियम लागू केला जाणार आहे.

RBI ने ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवे (payment gateways) द्वारे स्टोअर करण्यात आलेल्या ग्राहकांच्या डेटाला हटवण्यास आणि याजागी व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन (encrypted tokens)द चा वापर करण्यास सांगितलं आहे.

दरमहा पहिल्या तारखेला एलीपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर (LPG Cylinder Price) जारी होतात. तेल कंपन्या हे दर नवीन महिन्यातही जारी करतील. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की वर्षाच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढतायंत की कमी होतील.

गूगल (Google) देखील पुढील महिन्यापासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करत आहे. याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. हा नवीन नियम गूगल सर्व्हिसेस गूगल अॅड्स, यूट्यूब, गूगल प्ले स्टोर आणि अन्य पेमेंट सर्विसेसवर लागू होईल.

जर तुम्ही पुढील महिन्यापासून RuPay, American Express किंवा Diners Card चा वापर केलात, तर गूगलकडून तुमच्या कार्डची माहिती सेव्ह केली जाणार नाही. त्यामुळे पुढील महिन्यापासून पेमेंट करताना कार्ड डिटेल्स मॅन्युअली प्रविष्ट करावे लागतील.

दरम्यान, 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम चार्जेस 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं 

Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर 

“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील” 

विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले…