स्कुटीवाला अचानक मध्ये आला अन्…, व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

आजकाल अनेक अपघत घडल्याच्या घटना समोर येतात. त्यातील काही अपघातांचे व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. वाहन चालवताना अनेकजण वाहतूक नियमांचे पालन करत नाही. अशातच कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये एक भयानाक अपघात घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

केवळ एका लहानशा चुकीमुळे या अपघातात एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात सीसीटीव्हिमध्ये कैद झाला आहे.

व्हिडीओमध्ये असं दिसून येत आहे की, एका रस्त्यावर एक गाडी येत आहे. त्याचवेळी बाजूने एक स्कुटीवाला अचानक मधून गाडी घालून रस्ता ओलंडायचा प्रयत्न करत आहे. परंतू त्याच वेळी अचानक एक गाडी खूप वेगात त्या स्कुटीवाल्याकडे येत असते.

वेगात येत असलेल्या गाडीवाल्याला स्कुटीवाला अचानकमध्ये आलेला दिसल्यामुळे, तो गोंधळून जातो आणि त्याला वाचवण्यासाठी तो त्या स्कुटीला कट मारून पुढे जातो. मात्र कट मारताना त्याच्या बाजूने जात असलेल्या गाडीला त्याचा धक्का लागतो आणि तो वेगात असल्यामुळे पुढे जाऊन त्याची गाडी एका दुकानाच्या बाहेर असलेल्या पाईऱ्यांना धडकते.

त्यानंतर तो तरूण गाडीवरून खाली पडतो. याचवेळी बाजूचा गाडीवालाही आपल्या गाडीसोबत खाली रस्त्यावर पडतात. परंतू पुढे जाऊन गाडीवरून पडलेल्या तरूणाला या अपघातात जीव गमवावा लागला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच ज्या स्कुटीमुळे हा अपघात झाला, तो व्यक्ती अपघातानंतर पळ काढताना दिसत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘मंगळूरसिटी’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत सात हजार लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओ अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या-

कोरोनाबाधित 95 वर्षाच्या आजीने असं काही केलं की, व्हिडीओ…

‘इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी जडेजा घेतोय मेहनत, पाहा व्हायरल…

जाणून घ्या! कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास…

‘बाटलीत मूत आणि तेच सॅनिटाईझर म्हणून वापर’;…