आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद

मुंबई | कोरोना (Corona) महामारीच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दीड वर्षांपासून सर्वांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अशात आता कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरियंटने सर्वांची चिंता वाढवली आहे.

कोरोना आणि ओमिक्राॅन रूग्णसंख्या एकीकडे वाढत असताना आता राज्यातील शाळा महाविद्यालये बंद होणार का?, असा सवाल मागील काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता.

अशातच आता राज्य सरकारचे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंत्रीमंडळाची कोरोना आढवा बैठक पार पडली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

त्याचबरोबर राज्यातील विद्यापीठातील, महाविद्यालयातील परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जे विद्यार्थी इतर राज्यातून शिकण्यासाठी आले आहेत, त्यांच्यासाठी फक्त वसतीगृह सुरू राहणार आहेत, अशी माहिती देखील सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर देखील उदय सामंत यांनी सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांची तयारी करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

हात लावायचा नाय मला! महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदार भिडले!

आरोग्यमंत्र्यानी बुस्टर डोसविषयी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

 ‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा