‘ही’ लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा; Omicron ची 14 लक्षणं समोर

नवी दिल्ली | Omicron मुळे जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकडे कोरोनाची तिसरी लाट म्हणून पाहिले जात आहे. भारताबाबतच बोलायचं झालं तर येथे दररोज येणाऱ्या केसेसची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने आयसोलेट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्दी, खोकला, तीव्र डोकंदुखी, ताप, अंगदुखी ही आतापर्यंत ओमिक्रॉनचे काही सामान्य लक्षणे होती. मात्र या लक्षणासोबतच ओमिक्रॉनची आणखी लक्षणं असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

सध्या विषाणूच्या संसर्गाच्या वाढीसाठी कोरोनाचा नवीन प्रकार Omicron कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार पूर्वीच्या SARS-CoV-2 स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे, कारण इतर प्रकारांच्या तुलनेत याची गंभीरता कमी आहे. हा प्रकार वैद्यकीयदृष्ट्या देखील व्यवस्थापित केला जाऊ शकतो.

तज्ञांच्या मते, आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकाराबद्दल असं म्हटलं गेलं आहे की, यामुळे वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. यामुळे रुग्णामध्ये थंडी वाजून येण्यासारखी सौम्य लक्षणे निर्माण होतात आणि फुफ्फुसांचे कमी नुकसान होतं. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यूकेच्या ZOE COVID Study मधील डेटा वापरून, बिझनेस इनसाइडरने अलीकडेच ओमिक्रॉनविषयी सर्वात कमी आणि सर्वात जास्त लक्षणे दर्शविणारा एक चार्ट जाहीर केला आहे. हा चार्ट पाहून आपल्याला जाणवणारी लक्षणे ओमिक्रॉनची आहेत, की नाहीत याविषयी जाणून घेता येईल.

वाहणारे नाक: 73%, डोकेदुखी: 68%, थकवा: 64%, शिंका येणे: 60%, घसा खवखवणे: 60%,  सततचा खोकला: 44%., कर्कश आवाज: 36%,  थंडी वाजून येणे किंवा थरथरणे: 30%,  ताप: 29%, चक्कर येणे: 28%, मेंदूचे धुके: 24%, स्नायू दुखणे: 23%, वास कमी होणे: 19%, छातीत दुखणे: 19%, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होती.

बुधवारच्या रुग्णसंख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजार 532 रुग्णांची नोंद झाली आहे.

मृतांची संख्या देखील वाढली असून दिवसभरात 491 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. दिवसभरात 2 लाख 23 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा आरोप 

 अखेर तारीख ठरली! आमिर खानने केली मोठी घोषणा

प्रियंका गांधी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत??? मोठं वक्तव्य आलं समोर

 Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती

“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”